Home सामाजिक चंदनखेडा येथे १० जानेवारीपासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा थरार

चंदनखेडा येथे १० जानेवारीपासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा थरार

405

आमदार करण देवतळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

भद्रावती : स्थानिक शौर्य क्रीडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, चंदनखेडा यांच्या वतीने आणि ‘मेरा युवा भारत’ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनखेडा येथे भव्य तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी नरवीर तानाजी क्रीडोद्यान येथे रंगणार आहेत.

.      या क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन शनिवार, १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते होणार आहे. तर याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी (मेरा युवा भारत) सुशील भड, ए.पी.ए. मंगेश डुबे, राजू नामपल्लीवार, माजी उपसरपंच विठ्ठल हनवते, विकास दोहतरे, गुलाबजी भरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल चौधरी, मुख्याध्यापक पुनवटकर, सोनुने, अचलंचिवार आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदनखेडा गावचे सरपंच नयनराव जांभुळे राहणार असून, उपसरपंच्या भारती उरकांडे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. यासोबतच विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतीजी गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्या वनिता जांभुळे, डेव्हिस बागेसर, चंद्रशेखर निमजे, गजेंद्र रनदिवे, किशोर निखार, प्रभाकर दोडके, सिंगलदीप पेंन्दाम, फिरोज पठाण आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

.       कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोहर हनवते, समीरखान पठाण, पोलीस पाटील, अमृताताई कोकुडे, लताताई नन्नावरे व माजी ग्रामपंचायत सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

.     या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळणार असून, तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन शौर्य क्रीडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!