Home सामाजिक भद्रावतीत १२ जानेवारीला रंगणार सुरांचा आणि तालांचा जागर

भद्रावतीत १२ जानेवारीला रंगणार सुरांचा आणि तालांचा जागर

410

भव्य समूह नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन

चंद्रपुर : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील माजी विद्यार्थी संघ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि नफिस कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १२ जानेवारी २०२६ रोजी भव्य समूह नृत्य आणि गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित हा सोहळा दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

.         समूह नृत्य या स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क असून, प्रथम क्रमांकास ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ १ हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान केले जाईल. तर गीत गायन या स्पर्धेसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क असून, प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.

.          या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व कलाकारांना १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या ऑडिशनमध्ये आपली कला सादर करणे अनिवार्य आहे. ऑडिशनमधून निवड झालेल्या स्पर्धकांनाच मुख्य स्पर्धेत सहभाग घेता येईल.

.          भद्रावती शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त कलाकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन जयवंत काकडे (विवेकानंद महाविद्यालय) आणि नफिस अहमद (नफिस कॉम्प्युटर) तसेच आयोजक समितीने केले आहे.

error: Content is protected !!