जगन्नाथ महाराजांचा वार्षिक काला महोत्सव उत्साहात
उत्कृष्ठ भजन मंडळांचा गौरव
अनेक मान्यवर व पाहुण्यांचा सत्कार
चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु येथे विदेही सद्गुरू श्री. जगन्नाथ बाबा संस्थानच्या वतीने आयोजित सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचा भव्य वार्षिक काला महोत्सव 14 ते 16 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाने उत्साहात पार पडला. या वार्षिक काला महोत्सवाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला.
![]()
. जगन्नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान ‘जय जगन्नाथ’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात, भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण गाव आनंद आणि उत्साहाने भारून गेले होते.
. या पालखी सोहळ्याचे उद्घाटन ग्राम पंचायत पदाधिकार्यांचे हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पतसंस्था शाखा वरोरा चे संचालक परीक्षित एकरे हे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, दैनिक नवजीवन चंद्रपुर चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी सरपंच शरद खामनकर, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती नंदोरी चे अध्यक्ष घनश्याम ढवस, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती चे उपसभापती अश्लेषा भोयर, दादा झाडे, शरद लांबट, विठ्ठल विरुटकर, हरीदास एकरे, ग्राम पंचायत भटाळी चे सरपंच सुधाकर रोहणकर, व समस्त नंदोरी वासी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याचे वैभव या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग आणि टाळ-मृदंगाचा गजर. फुलांनी सजवलेल्या पालखीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मनोभावे पूजन केले. ठीकठिकाणी नास्ता, चहा चे स्टॉल होते. गावातील प्रमुख मार्गांवरून पालखी मार्ग क्रमण करत जगन्नाथ बाबा मठ येथे निरोप करण्यात आले. या पालखी सोहळ्यात गावो गावांतून महिला व पुरूषांचे भजन मंडळांचा समावेश होता. सोबतच बाल वारकऱ्यांचा मोठा सहभाग होता. ![]()
विविध कार्यक्रमांचे आयोजन पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन आणि महाप्रसादाचा समावेश होता. भक्तीच्या या महाकुंभात संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते.
मान्यवरांचा सत्कार या मंगल प्रसंगी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि पाहुण्यांनी उपस्थिती लावली. उत्सवाचे औचित्य साधून मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपुर चे अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपुर चे संचालक जयंत टेमुर्डे, शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे व अनेक पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
![]()


