Home सामाजिक अंबरदादा जीवतोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

अंबरदादा जीवतोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

454

​स्व. श्रीहरी जीवतोडे कृषीतंत्र विद्यालयाचे आयोजन

विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून अंबर दादांच्या कार्याचा गौरव

चंद्रपुर : ​सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या आणि जनमानसात लोकप्रिय असलेले अंबरदादा जीवतोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते ३ वाजताच्या दरम्यान स्व. शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे कृषीतंत्र विद्यालय, नंदोरी येथे मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य स्वरूपात पार पडला.
यावेळी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतक, युवक आणि महिला मंडळांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली होती. ​याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अंबरदादा जीवतोडे यांच्या सामाजिक कार्याचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेच्या योगदानाचा गौरव केला. दादांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अनेकांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

.       ​या कार्यक्रमाला आनंदराव जीवतोडे, वसंतराव जीवतोडे, पांडुरंग लांबट, नरेंद्र जीवतोडे, मंगेश भोयर, किशोर उमरे, विनोद लांबट, वाल्मीक घागी, धनराज विरुटकर, गुरुदेव हरणे, अशितोष घाटे, दादाजी झाडे, अश्लेषा जीवतोडे (भोयर), चंद्रशेन देरकर, प्रफुल वाभीटकर, दयानंद जांभुळे, गजानन विरुटकर, राजू ठेंगणे, रवी खाडे, संदीप लांबट, मोहन ठेंगणे, उषा लांबट, निळकंठ अवगान इत्यादी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

.    या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला बचतगट, भजन मंडळे आणि विविध क्रीडा मंडळाचे युवा गट यांची प्रचंड उपस्थिती होती. किन्हाळा, सोनेगाव, नंदोरी, पावना, धानोली, पानवडाळा, पिर्ली, बेलगाव, मासळ, मांगली, धामणी, आगरा आणि सागरा येथील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती, ज्यामुळे दादांच्या कामाची व्याप्ती सिद्ध झाली. क्रीडा मंडळ नंदोरी, आष्टी (काकडे), डोंगरगाव, पिर्ली, पावना येथील तरुणांचा सहभाग होता.

.    ​याप्रसंगी प्राचार्य महातळे व जेष्ठ मान्यवरांनी अभिष्टचिंतनपर आपले विचार प्रभावीपणे मांडले. अरुण जोगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर किशोर उमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!