Home सामाजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या संस्कृतीची निर्मिती केली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या संस्कृतीची निर्मिती केली

460

डॉ. निरज बोधी यांचे प्रतिपादन

धानोरी येथे बुद्ध मूर्ती वर्धापन समारंभ

पवनी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून शरिराने गेले.मात्र त्यांनी वैचारिक क्रांती घडविली.भारतीय राज्यघटना याला साक्षी आहे. याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. त्यांचे कार्य केवळ विशिष्ट समाज नाही, तर सर्व भारतीय बांधवांना प्रेरणा देणारा आहे.त्यांनी या देशातील प्राचीन तथागत बुद्धांच्या धम्माची शिकवण दिली. खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशात नव्या संस्कृतीची निर्मिती केली, असे प्रतिपादन नागपूर रा. तु. म. विद्यापीठातील पाली विभाग प्रमुख डॉ. निरज बोधी यांनी पवनी तालुक्यातील धानोरी येथील कार्यक्रमात शनिवारला केले.

.       पवनी तालुक्यातील धानोरी येथे सिद्धार्थ सेवा मंडळाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना वर्धापन दिन समारंभ डॉ आंबेडकर चौक येथे पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखाराम मंडपे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पि. एस. खोब्रागडे, चंद्रभूषण मेश्राम, एकनाथ मेश्राम, सरपंच गिता मंडपे, उपसरपंच शिला ठाकूर, विसापूर ता. बल्लारपूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, सिद्धार्थ सेवा मंडळाचे ट्रस्टी सिद्धार्थ मंडपे, देवा सतिबावणे, स्वप्नील मंडपे, पुष्पवंता येवले, मंदा मंडपे, सुनैना मंडपे, मिनाक्षी कानेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

.       सलग दोन दिवसाच्या कार्यक्रम दरम्यान डॉ. अश्विनी भांडेकर यांच्या माध्यमातून रोगनिदान शिबीर घेण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित पंचशील ध्वजारोहण व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सिद्धार्थ मंडपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टी सिद्धार्थ मंडपे, अध्यक्ष लिलेश्वर रामटेके, मिना मंडपे, संदीप आवळे, विलास मंडपे, किसन मंडपे, राईबाई शेंडे, रेखा मंडपे, लिला शेंडे आदी सिद्धार्थ सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची परिश्रम घेतले.

error: Content is protected !!