Home सामाजिक वरोऱ्यात 14 डिसेंबरला भव्य आरोग्य तपासणी शिबिर

वरोऱ्यात 14 डिसेंबरला भव्य आरोग्य तपासणी शिबिर

440

सुश्रुत हॉस्पिटल, माधवबाग वरोरा व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, वर्धा यांचे संयुक्त आयोजन

वरोरा : स्थानिक नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्य जागरूकतेसाठी व मोफत तपासणीसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सुश्रुत हॉस्पिटल, माधवबाग वरोरा आणि महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वि. एम. टॉवर, रिलायन्स स्मार्ट पॉइंटसमोर, बोर्डी चौक, वरोरा येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.        या शिबिरात मोफत तपासणी तसेच पुढील उपचारांवर सवलतीच्या योजना उपलब्ध असणार असून, विविध विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. या शिबिरात मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसील, शरीरातील गाठी, जखम, वेदना आणि जळजळ यासह शस्त्रक्रिया संबंधी तपासणी, डोळ्यांचे विकार व नजरेची तपासणी, मेंदू व मणक्याचे रोग, कान-नाक-घसा तपासणी, बालरोग व नवजात शिशु तपासणी, मधुमेह व इतर चयापचय विकार, हृदयविकार आणि रक्तविकार मार्गदर्शन तसेच विविध उपचारांवर सवलत व शस्त्रक्रियेसाठी विशेष मार्गदर्शन होणार आहे.

.        या शिबिरात सेवाभावी तज्ज्ञ डॉक्टर डॉ. शीतल आसुटकर शस्त्रक्रिया तज्ञ, विभाग प्रमुख (सर्जरी), महात्मा गांधी रुग्णालय, वर्धा डॉ. शिवानी ढवस कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. शेंडे नेत्ररोग तज्ञ, डॉ. वसंत ढवस बालरोग व नवजात तज्ञ, डॉ. राकेश अंबाटी किडनी रोग तज्ज्ञ, डॉ. सोहेल काझी मेंदू व मणक्याचे विकार तज्ञ, डॉ. रागिणी राव अंबाटी मधुमेह व चयापचय विकार तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे. या शिबिराचे आयोजन सुश्रुत हॉस्पिटल व माधवबाग वरोरा टीम डॉ. पवन डोंगरे, डॉ. मनीषा डोंगरे यांनी केले आहे. सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!