Home सामाजिक पिरलीत दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने

पिरलीत दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने

454

सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील पिरली येथे सामाजिक कार्यकर्ते अंबर अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित न्यु तुकडोजी क्रिडा मंडळ, पिरली च्या वतीने दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने दि. 12 व 13 डिसेंबर 2025 रोजी सेवा सहकारी संस्था पिरली च्या भव्य पटांगणामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी सामन्याचे आयोजन अंबर अशोक जिवतोडे यांनी केले आहे.

या कबड्डी सामन्याचे उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे करणार आहे तर अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अंबर अशोक जिवतोडे हे राहणार आहे. प्रमुख पाहुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर चे अध्यक्ष रविंद्र शिंदे, ग्राम पंचायत पिरली च्या सरपंच वर्षा तरारे, उपसरपंच नेताजी पिंपळशेंडे, ग्राम अधिकारी वामन राजुरकर, ग्राम पंचायत सदस्य शुभम येरगुडे, शितल देठे, निशा काळे, निरदोष मडावी, शिल्पा कावळे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विष्णुदास मत्ते, जिल्हा परिषद शाळा पिरली चे मुख्याध्यापक संगेल, श्रीरंग ठेंगे व गावकरी उपस्थित राहणार आहे.

कबड्डी सामन्यामध्ये राहणार नियम व अटी                                                                                                                                         नैसर्गिग आपतीस मंडळ जवाबदार राहनार नाही, खेळाडूच्या जीवीतहानीची जबाबदारी स्वतःची राहील, काही निर्णय मंडळा कडे राखीव राहील, पंचाचा निर्णय अंतीम निर्णय राहील. नशापानी करून गोंधळ करूनये तसे झाल्यास पोलिसांच्या स्वाधीन करन्यात येईल, वजन करून खेडाळु खेळवीन्यात येईल,  आयपीएल संघ स्विकासन्यात येईल, ऑपजेक्शन फोटो वर होईल,  ऑपजेक्शन एकच मींटात घेता येईल, एक खेळाडु एकाच संघार खेळल्या जाईल.

error: Content is protected !!