ग्रामीण भागात 3६६, तर शहरात ८८४ मतदार
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील वास्तव
बल्लारपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये बल्लारपूर तालुक्यात एकूण १२५0 मतदारांची नोंदणी झाल्याचे वास्तव समोर आले आहे. यात ग्रामीण भागात 3६६ ,तर शहरात ८४४ मतदारांनी पदवीधर मतदार संघात नोंदणी केल्याचे वास्तव समोर आले आहे.
. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर पदवीधरांची नोंदणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आली. त्यानुसार बल्लारपूर येथील मतदान केंद्र २3४ मध्ये ग्रामीण भागातील मतदार मध्ये २२२ पुरुष व १४४ महिला असे एकूण 3६६ पदवीधर मतदार नोंदणी झाली आहे.
. बल्लारपूर शहरातील मतदान केंद्र २3५ मध्ये पुरुष ४७१ व महिला ४१3 असे एकूण ८८४ पदवीधरांची नोंदणी झाली आहे. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये विसापूर, बामणी, नांदगाव ( पोडे ),कोठारी, पळसगाव, मानोरा, ईटोली,कवडजई येथील मतदारांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागात देखील पदवीधरांची संख्या असल्याचे वास्तव मतदार नोंदणीतून समोर आले आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची बल्लारपूर तालुक्यातील व शहरातील पदवीधर मतदार प्रारूप यादी 3 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी १ नोव्हेंबर २0२५ अर्हता तारखेला अनुसरून तयार करण्यात आली आहे.


