Home सामाजिक विसापूर ग्रामपंचायत तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

विसापूर ग्रामपंचायत तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

431

बल्लारपूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विसापूर ग्रामपंचायत मध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा आढावा विषद केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या.

.      यावेळी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, सुरेखा ईटनकर, हर्षला टोंगे, गजानन पाटणकर, दिलदार जयकर, सुनील रोंगे,ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, संतोष निपुंगे, राहूल टोंगे, अशोक ठुणेकर, सुरज डबरे यांची उपस्थिती होती.

.     यावेळी मार्गदर्शन करताना रामभाऊ टोंगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकांना समान अधिकार, समानता, स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक, राजकीय अधिकार दिले. त्यांनी मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय असल्याचे सांगितले आहे. हे त्यांची शिकवण सर्वांनी अंगिकारावी असे मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!