Home सामाजिक गडचांदूरात महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचा गजर

गडचांदूरात महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचा गजर

448

सप्त खांजेरी वादक आकाश टाले यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम

गडचांदूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खांजेरीने, ब्रिटिश काळात गावच्या -गाव इंग्रजा विरोधात पेटून उठलेत,समाज प्रबोधनातुन जागृत झालेल्या समाजाने ब्रिटिश सरकारला सडो की पडो करून सोडले, त्याच खांजेरीचा वारसा चालवीणारे वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य युवा कीर्तनकार आकाश महाराज टाले समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आज समाज जागृतीचे कार्य करीत आहेत.

.    समाजात चालत आलेल्या अरिष्ट चाली – रीती, परंपरा, व्यसनधीन झालेला समाज, अंधश्रद्धा, कर्मकांड अशा अनेक विषयावर आपल्या खांजेरीच्या साह्याने प्रबोधनाच्या माध्यमातून समाज मनावर वार करणारे सप्तखांजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य युवा कीर्तनकार आकाश महाराज टाले नागपूर,यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन, वरदान दुर्गोउत्सव मंडळ व दत्त जयंती मोहत्सव कमेटी गडचांदूरच्या वतीने दि. 6 डिसेंबर रोज शनिवारला साय. 7 वाजता, गांधी चौक गडचांदूर येथे आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!