Home सामाजिक अखेर पिंपळगाव-गडचांदूर रस्त्याच्या कामाला मिळाला निधी

अखेर पिंपळगाव-गडचांदूर रस्त्याच्या कामाला मिळाला निधी

452

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील पिंपळगाव-गडचांदूर-नांदा या रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी व गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावरील खड्डे आणि दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटनाही मोठ्या संख्येने घडत होत्या.

.       या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने, पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली. त्यांनी या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

.       खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जिल्हा विकास योजनांतर्गत या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात होणार असल्याने , पिंपळगाव-गडचांदूर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांवर आभार मानले जात आहे.

error: Content is protected !!