विविध कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु येथे जगद्गुरु अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री साईनाथ महाराज यांचा वार्षिक कला व महाप्रसाद दि. 27 व 28 नोव्हेंबर 25 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
. गुरुवार दि. 27 ला सकाळी 6 वाजता परिसर स्वच्छता, स. 10 वा. घटस्थापणा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंदू वासाडे तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण ठेंगणे, चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपुर चे अध्यक्ष रविंद्र शिंदे राहणार आहे. प्रमुख पाहुणे ग्राम पंचायत भटाळी चे सरपंच सुधाकर रोहणकर, कांग्रेस चे भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, ग्राम पंचायत नंदोरी बु चे सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आशुतोष तिखट, शिवसेना चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, नगर परिषद वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शेतकरी उत्पादक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, जिल्हा परिषद चंद्रपुर च्या माजी सदस्या अर्चना जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे, दैनिक नवजीवन चंद्रपुर जी जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे खासदार प्रतिनिधी सुभाष दांदडे, ग्राम पंचायत सदस्या किशोर उमरे, अजित पुसनाके, शरद खामनकर, माजी उपसरपंच भानुदास ढवस, धनराज विरुटकर व गावातील नागरिक उपस्थित राहणार आहे.
. सायंकाळी 7 वाजता हरिपाठ, सायं. 8 वा. हरिपाठ होणार असून शुक्रवार दि. 28 ला सकाळी ६ वा. श्रीमंत जगद्गुरु अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री साईनाथ महाराज वार्षिक काला प्रतिष्ठापना शके १९४४ मिती मार्गशीर्ष शुक्ल ८ शुक्रवारला सकाळी ६.३० ते २.३० पावेतो प्रतिष्ठापना, सकाळी ७.३० वा. पालखी सोहळा, सकाळी १० वा. किर्तन सोहळा, दुपारी २.३० ते ३.३० वा. दहीहांडी काला / महाप्रसाद / किर्तन ह. भ. प. श्री. पांडुरंग लांबट महाराज, सायं. ४ वा. महाप्रसाद होणार आहे. श्री. साईनाथ महाराज यांचा वार्षिक कला व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. साईबाबा देवस्थान नंदोरी बु व गावकर्यांनी केले आहे.


