Home सामाजिक नंदोरीत दोन दिवशीय भव्य कबड्डी सामने

नंदोरीत दोन दिवशीय भव्य कबड्डी सामने

508

सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे यांच्या नेतृत्वात आयोजन

चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे सामाजिक कार्यकर्ते अंबर अशोक जिवतोडे यांच्या सौजन्याने वरिष्ठ हनुमान क्रिडा मंडळ, नंदोरी बु च्या वतीने दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने दि. 28 व 29 नोव्हेंबर 2025 रोजी गजानन नगरी च्या भव्य पटांगणामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी सामन्याचे आयोजन अंबर अशोक जिवतोडे यांनी केले आहे.

.       या कबड्डी सामन्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अंबर अशोक जिवतोडे हे करणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

.       नंदोरी-मांगली जिल्हा परिषद क्षेत्रातील कबड्डी खेळाडूंना प्रवेश फी राहणार नसून जिल्हा परिषद क्षेत्राबाहिल कबड्डी खेळाडूंना एका गटास 1 हजार तर दोन्ही गटास 1 हजार आठशे रुपये प्रवेश फी राहणार राहणार आहे.

.       या कबड्डी सामन्यामध्ये खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अंबर अशोक जिवतोडे व वरिष्ठ हनुमान क्रिडा मंडळ, नंदोरी बु च्या सर्व सदस्यांनी केले आहे, जेणेकरून ते त्यांच्यातील खेळाचे कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती दाखवू शकतील. या आवाहनातून कबड्डीच्या माध्यमातून तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

कबड्डी सामन्यामध्ये राहणार नियम व अटी                                                                                                                                          ओव्हर वेट व फोटोमध्ये नसल्यास संघ बाद करण्यात येईल, पंचाचा निर्णय अतिम राहील, बाहेरून येणाऱ्या संघाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था मंडळाकडे विनामुल्य राहील,  एका खेळाडूला एकाच संघात खेळता येईल, काही नियम मंडळाकडे राखील राहिल, नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही, नशा पाणि करून खेळू नयें, ग्राऊंड वेट होणार नाही, काही नियम व अटी मंडळाकडे राखीव राहिल.

शिक्षणासोबतच कबड्डी खेळामध्ये सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते. कबड्डी हा एक सांघिक खेळ असून तो ताकद, चपळता आणि रणनीती शिकवतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे आणि शिक्षणाच्या बरोबरीनेच कबड्डीसारख्या खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. म्हणून नंदोरी येथील भव्य कबड्डी सामान्यामध्ये  सहभागी व्हा.                                                                                                                         अंबर अशोक जिवतोडे,        सामाजिक कार्यकर्ते, नंदोरी मांगली जिल्हा परिषद क्षेत्र

 

error: Content is protected !!