नागरिकांना सुलभ आरोग्य देण्यासाठी दिल्या सूचना
ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आदरातिथ्य
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारला सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना सुलभ आरोग्य सेवा देण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.हे पहिल्यांदाच विसापूर येथे भेट दिल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आदरातिथ्य करून रेल्वे समस्या बाबत निवेदन सादर केले.
. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या सोबत बल्लारपूर चे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणुका कोकाटे, चंद्रपूर चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मिना मडावी, प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अविशा मडावी, विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, मंडळ अधिकारी किशोर नवले यांची उपस्थिती होती.
. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी स्मार्ट आरोग्य केंद्र करण्याच्या अनुषंगाने आरोग्य केंद्रातील पाणी गळती, आपरेशन कक्ष सुधारणा, विज जोडणी, सोलर पॅनल अद्यावत करण्यासाठी उपाययोजना, शौचालय अद्यावत व स्वच्छ ठेवण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. दरम्यान विसापूर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ प्रदान सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य रिना कांबळे, प्रदीप गेडाम, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी भूमिगत रेल्वे मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे.
. विज दिव्याची व्यवस्था नाही. उड्डाणपूल गावाला आवश्यक आहे. पावसाळ्यात रेल्वे पुलातून आवागमन करण्यासाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या निवेदन सादर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली. यावेळी त्यांनी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


