विवाहाची पंचक्रोशीत चर्चा
वरोरा : तालुक्यातील आकोला नं.१ येथील गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने काल तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. दैनिक तरुण भारत पुरस्कृत या सामूहिक तुळशी विवाहाने गावकऱ्यांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे काम केले आहे. या विवाहाला अख्खे गावच उपस्थित होते या तुळशी विवाहाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
![]()
. ग्रामीण भागात तुळशी विवाहाला सांस्कृतिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. या तुळशी विवाहाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे काम आकोला येथील ग्रामवासी नेहमीच करीत असतात. त्याचाच प्रत्यय या तुळशी विवाहाच्या माध्यमातून दिसून आला.
. तरुण भारतच्या माध्यमातून हा तुळशी विवाह गावात घेण्यात आला. या विवाहासाठी तरुण भारतनी साहित्य पुरविले होते. यावेळी गावातून बँडवाजामध्ये वराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाच्या आवारात वधू पक्षाकडून वर पक्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूजाअर्चा, अंतरपाठ आणि मंगलाष्टकाच्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. विवाहानंतर आरती करण्यात आली. गावातील शामदेव उमरे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. रात्रोला महिला मंडळाच्या वतीने भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
![]()
. आकोला छोट्याशा गावात विविध कार्यक्रम होत असतात. पण हा आगळावेगळा कार्यक्रम ठरल्याचे लोकांनी सांगितले. गावामध्ये चार-पाच मुलं मुली लग्नाची आहेत. त्यांची लग्न लवकर जुडो, अशी साकडे गावकऱ्यांनी यावेळी घातली. संचालन आणि आभार अरुण उमरे यांनी केले.
. या विवाह सोहळ्याला गुरुदेव सेवा मंडळाचे सदाशिव उमरे, भास्कर चवले, गजानन उमरे, केशव उमरे, शामदेव उमरे, निखिल चवले, कमलाकर काकडे, चिंतामण बुटके, भैय्या उमरे, तात्याजी उमरे, भाऊराव भोगेकर, प्रतिभा उमरे, शामराव मटाले, विठ्ठल पुसाम, महेश उमरे, लहानू बावणे, भागरथा उमरे, अशोक उमरे, प्रकाश उमरे, पुंडलिक नन्नावरे, छोटू चवले, शशिकला चवले, मिना उमरे, कुसुम सावसाकडे, अरुणा गाढवे, छाया उमरे, मोतीराम घानोडे, दामोदर मटाले, अंजना भोगेकर, कल्पना कळसकर, हरी कळसकर,इंदिरा बुटके, मिरा बुटके, रेखा उमरे, दिवाकर रंदई, निलेश काकडे, वंदना काकडे, दिलीप भोगेकर, कलावती मटाले, शशिकला मटाले, सरिता पुसाम, कवडू पुसाम, बेबी घानोडे, पार्वता उमरे, कुमुद उमरे, अर्चना उमरे, भगवान उमरे, रंजना नन्नावरे, अर्चना नन्नावरे, विठ्ठल नन्नावरे, पवन घानोडे, विठ्ठल उमरे, पांडुरंग उमरे, श्रीहरी उमरे, शालिक घानोडे, आदी उपस्थित होते. या सामूहिक तुळशी विवाहामुळे गावकऱ्यांमध्ये धार्मिक मूल्याची जाणीव अधिक बळकट होणार आहे.


