भद्रावती : विठ्ठलजी रामकृष्ण हनवतेमित्र परिवार व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य किडा मंडळ समस्त गावकरी चंदनखेडा द्वारा आयोजित विठ्ठलजी रामकृष्ण हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा गुरुवार दि. 06 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजता गुरुदेव प्रार्थना मंदिर चंदनखेडा येथे आयोजन केले आहे.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नागोराव ठावरी उपस्थित राहणार तर उद्घाटक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील समिरखान पठान, भारतीय डाक विभाग अधिकारी जगदीश देवगीरकर तर मार्गदर्शक रक्त केंद्र प्रभारी डॉ. अमित प्रेमचंद, समाजसेवक अधीक्षक राकेश शेंडे, रक्त केंद्र तंत्रज्ञ डॉ. अमूल रामटेके उपस्थित राहणार आहे.
. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र, गुरुदेव सेवा मंडळ, महिला बचत गट व समस्त गावकरी चंदनखेडा, विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ चरूर (था) बिरसा बचत गट कोकेवाडा (मा). या संघटनेचे सहकार्य लाभणार आहे.


