Home सामाजिक विसापुरात मुख्यमंत्री पंचायतराज अभियान तपासणी

विसापुरात मुख्यमंत्री पंचायतराज अभियान तपासणी

541

निकष पूर्ण करण्याचे दिले निर्देश

समितीच्या अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायत तर्फे आदरातिथ्य

बल्लारपूर : शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सशक्त पंचायत, समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तपासणी पथकाने बुधवारी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत मध्ये भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे आदरातिथ्य केले. दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील निकष पूर्ण करण्याचे निर्देश समितीच्या प्रमुख जिल्हा परिषद प्रकल्प संचालक मंजिरी टकले यांनी ग्रामपंचायत ला दिले.

.      यावेळी तपासणी समितीच्या प्रमुख जिल्हा परिषद प्रकल्प संचालक मंजिरी टकले, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, पंचायत विस्तार अधिकारी दिलीप बैलनवार, कृषी विस्तार अधिकारी नितीन ढवस, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र लामगे, सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, घरकुल बांधकाम अभियंता प्रमोद शास्त्रकार, पंचायत अधिकारी गणेश कोकोडे, ग्रामपंचायत सदस्य विद्या देवाळकर, रिना कांबळे, शशीकला जीवने यांची उपस्थिती होती.

.    यावेळी मंजिरी टकले यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल, समृद्ध, स्वच्छ व हरीतगाव, मनरेगा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी, गावपातळीवर संस्थेचे सक्षमीकरण, सामाजिक न्याय व उपजिवीका विकास, लोकसहभागातून विकास आदी बाबींचे उपक्रम सुरु निकष पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान प्राथमिक तपासणी दरम्यान काही बाबींवर विचारणा केली. आयुष्यमान कार्ड उद्दीष्ट गाठण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

.        यावेळी विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक मंजिरी टकले यांचे पुष्पगुच्छ प्रदान करून आदरातिथ्य केले. यावेळी बचत गटांच्या पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!