Home सामाजिक नंदोरी येथे मोफत ऑनलाईन सेवा कार्यक्रम

नंदोरी येथे मोफत ऑनलाईन सेवा कार्यक्रम

595

जनतेच्या सेवेसाठी अंबर जिवतोडे यांचा उपक्रम

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे यांच्या वतीने मोफत ऑनलाईन सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

.           शिबिरामध्ये लाडकी बहीण योजना, जनआरोग्य योजना, शेतीविषयक अनुदान योजना, तसेच इतर महत्वाच्या शासन योजनांचे केवायसी (KYC) व ऑनलाइन नोंदणी मोफत करण्यात आली.

.          या उपक्रमाला नंदोरी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाच्या योजनांचा लाभ घेतला. गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अंबर जिवतोडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना आणि सेवा पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी तंत्रज्ञान व आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी असे उपक्रम गावागावात राबविण्यात येत आहेत.” आज माझ्या गावापासून सुरुवात केली आहे.                                                                                                  अंबर जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते, नंदोरी

error: Content is protected !!