Home चंद्रपुर जिल्हा विशेष अध्यक्षपदांच्या आरक्षण सोडतीने मोर्चेबांधणी येणार वेग

अध्यक्षपदांच्या आरक्षण सोडतीने मोर्चेबांधणी येणार वेग

613

नगर विकास विभाग आज काढणार सोडत

चंद्रपूर जिल्ह्यात केवळ तीन नगरपालिका ‘ब’ वर्गात

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक तीन, चार वर्षापासून रखडल्याने प्रशासकांच्या हाती कारभार आहे. यामुळे नागरिकांची कामे प्रभावित होत आहे. अशातच जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती आरक्षण सोडत नुकतीच काढली. आता नगर विकास विभागाने नगरपालिका व नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवार (दि.६) रोजी काढण्याची तयारी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १७ नगरपालिका, नगरपंचायत आहे. यामध्ये केवळ तीन नगरपालिका ‘ब’ असून १४ चा समावेश ‘क’ वर्गात आहे. आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

.        चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती व वरोरा या नगरपालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात आहे. राजुरा, मूल, ब्रम्हपुरी, गडचांदूर, नागभीड, चिमूर व घुग्घुस नगरपालिका ‘क’ वर्गात आहे. यासोबतच कोरपना, जिवती, पोभूर्णा, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही व भिसी येथे नगरपंचायत आहे.

.       जिल्ह्यातील १0 नगरपालिका व ७ नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण मुंबई येथे मंत्रालयात नगर विकास विभाग आज सोमवारी जाहीर करणार आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली आहे. आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढले जाणार असून यामध्ये अध्यक्ष पद महिलासाठी राखीव करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या नगरपालिकेत व नगरपंचायत मध्ये कोणत्या प्रवर्गातून अध्यक्ष पद मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!