Home सामाजिक डॉ. नेहांचा आचार्य पदवीचा प्रेरणादायी प्रवास !

डॉ. नेहांचा आचार्य पदवीचा प्रेरणादायी प्रवास !

569

डिजिटल युगावर केले संशोधन

दृढ संकल्पनेतून साकारली यशोगाथा

बल्लारपूर : कोव्हीड संक्रमण चा काळ होता. अशातच गर्भारपण आले. मात्र, तिचा दृढ निश्चय दांडगा होता. आचार्य पदवीचा ध्यास ठाम होता. डिजिटल युगावर तिचे संशोधन सुरू होते.या संशोधनात तिने सातत्य ठेवले. अखेर ‘संशोधकांमधील सामाजिक साइट्सचा शोध (२0१0 – २0१८)’ या विषयावर आचार्य पदवीचा सन्मान मिळाला. दृढ संकल्पनेतून यशोगाथा साकारणाऱ्या डॉ. नेहा सरिता गंगाधर गिरडकर यांचा आचार्य पदवीचा प्रेरणादायी प्रवास कौतुकास्पद आहे.

.      गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाने डॉ. नेहा यांचा पीएचडी पदवी बहाल करुन अलीकडेच सन्मानित केले. त्यांनी आपले संशोधन डॉ. एस.बी.किशोर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. संशोधकांनी सामाजिक माध्यमांचा वापर कसा केला, आणि त्याचा त्यांच्या कार्यावर कसा परिणाम झाला, यावर सखोल अभ्यास केला आहे. डिजिटल युगासाठी प्रेरणा देणारे आहे.

.      डॉ. नेहा यांनी एम.एससी. संगणक विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. त्यांनी चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात पाच वर्षे सहाय्यक व्याखाता म्हणून सेवा केली. आजघडीला त्या बल्लारपूर येथे एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.डॉ. नेहा यांचे संशोधन २0१0 ते २0१८ या कालावधीत संशोधकांनी सामाजिक साइट्सचा वापर कसा केला, यावर केंद्रीत होते. या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक संबंधित सहभागाचे विश्लेषण केले. संशोधनाशी संबंधित माहिती शेअर करणे, सहकार्य निर्माण करणे, डिजिटल प्लॉट फॉर्मवर नेटवर्किंग सारख्या पैलुंचा समावेश केला. त्यांनी आनलाईन सर्वेक्षण, मुलाखती आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून संशोधकांच्या डिजिटल वर्तनाचे नमुने शोधले. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल साक्षरतेचे महत्व अधोरेखित होण्यास मदत झाली आहे.

.     डॉ. नेहा यांना संशोधनाच्या प्रारंभी काळात कोव्हीड संक्रमण काळाने मोठी अडचण आली. मात्र, त्या डगमगल्या नाही. दृढ निश्चय बाळगला. विशेष म्हणजे गर्भारपण आले. तरीही त्यांनी संशोधनात खंड पडू दिला नाही. अखेर त्यांनी आचार्य पदवीचे ध्येय साध्य केले. मार्गदर्शकाचे प्रोत्साहन व कुटुंबाचे सहकार्य मोलाचे ठरले, असे डॉ. नेहा आवर्जून सांगतात. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे. त्यांनी आपल्या यशोगाथेला सहकार्य व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक डॉ. एस. बी. किशोर, पती डॉ. वेदानंद अलमस्त, आई सरिता गंगाधर गिरडकर व कुटुंबाच्या पाठींब्याने यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!