Home सामाजिक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला राखीव

चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला राखीव

639

जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या सभापती पद जाहीर

ग्रामविकास विभागाने जाहीर केले आरक्षण सोडत

   अनेकेश्वर मेश्राम

बल्लारपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला साठी आरक्षीत करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे १५ तालुक्यातील सभापती पदाची सोडत देखील जाहीर केली आहे. यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कोणत्या पंचायत समिती ला, कोणत्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

.         चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये नव्याने ५६ गट व १५ पंचायत समिती मध्ये ११२ गणाला नुकतीच राजपत्रात प्रसिध्द दिली आहे. आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक नंतर अध्यक्ष पदी आता अनुसूचित जाती महिला (एस.सी.) विराजमान होणार आहे. त्याच प्रमाणे १५ पंचायत समिती मध्ये एका पंचायत समिती वर अनुसूचित जाती सर्वसाधारण व एका ठिकाणी अनुसूचित जाती महिला सभापती पदी वर्णी लागणार आहे. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून एका पंचायत समितीवर सर्वसाधारण तर दोन पंचायत समिती मध्ये अनुसूचित जमाती महिला सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन सभापती सर्वसाधारण, तर दोन पंचायत समिती मध्ये महिला सभापती होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून तीन सभापती पद सर्वसाधारण व तीन पंचायत समितीत सर्वसाधारण वर्गातून महिला सभापती होतील.

error: Content is protected !!