Home सामाजिक बल्लारपुरातील प्राधान्य कुंटुबातील शिधापत्रिका धारकांना धान्य पुरवठा करा

बल्लारपुरातील प्राधान्य कुंटुबातील शिधापत्रिका धारकांना धान्य पुरवठा करा

650

भाजपाचे तहसिलदारांना निवेदन

प्रतिलीपीच्या माध्यमातून आमदारांना साकडे

बल्लारपूर : शासनाने केसरी शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुंटुबातील अन्न सुरक्षा कायद्यानुसार धान्य पुरवठा केला जात आहे. मात्र, अनेक शिधापत्रिका धारक यापासून वंचित आहे. विशेष म्हणजे नवीन शिधापत्रिका धारक शिधापत्रिका तयार करत आहे. अशा केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न, धान्य पुरवठा केला जात नाही. तहसील प्रशासनाने केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य पुरवठा करावे, असे निवेदन बल्लारपूर भाजपाने तहसिलदार रेणुका कोकाटे यांना सादर करुन अन्न धान्य पुरवठा करण्याची विनंती केली आहे.

.       बल्लारपूर शहर भाजपाचे अध्यक्ष ॲड. रणंजय सिंह यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी मंगळवार (दि. ९) रोजी बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांना निवेदन सादर करून केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य पुरवठा करण्याबाबत विनंती केली. यावेळी त्यांनी निवेदनात म्हटले की, मागील आठ महिन्या पासून शहरातील अनेकांनी केशरी शिधापत्रिका तयार केली. केशरी शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुंटुब म्हणून अन्न धान्य पुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र, केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य वाटप केले जात नाही. परिणामी शिधापत्रिका धारक असून देखील अन्न, धान्य मिळत नाही. शासनाने अन्न सुरक्षा कायदा लागू केला. त्यानुसार केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न, धान्य पुरवठा करणे आवश्यक आहे. याबाबत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे साकडे घातले आहे. बल्लारपूर शहरातील केशरी शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुंटुबातील लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याची मागणी तहसिलदार रेणुका कोकाटे यांना सादर केलेल्या निवेदनातून केली.

.      बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांना निवेदन सादर करण्यात आलेल्या शिष्टमंडळात भाजपचे शहर अध्यक्ष ॲड. रणंजय सिंह, शहर महासचिव घनश्याम बुरडकर, मिथीलेश खेंगर, ओमप्रकाश प्रसाद, अजय खोब्रागडे, विशंक ठाकूर, सुरेखा श्रीवास्तव, सर्वेश मिश्रा, जीतेंद्र गुप्ता, गोलू सचदेव, राजेश शहा आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

error: Content is protected !!