Home सामाजिक शेतावर जाणाऱ्या मार्गाचे अद्यावत करण्यासाठी सहकार्य करा – रेणुका कोकाटे

शेतावर जाणाऱ्या मार्गाचे अद्यावत करण्यासाठी सहकार्य करा – रेणुका कोकाटे

636

बल्लारपूर : महसूल प्रशासन जनतेमधील महत्वाचा दुवा आहे.या अनुषंगाने १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या रस्त्यांची समस्या निकाली काढण्याचे योजिले आहे. पाणंद रस्त्यांची समस्या महत्वाची आहे. यासाठी गावपातळीवर पाणंद रस्ते अद्यावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी तहसील कार्यालयात आढावा सभेत मंगळवार (दि. ९) रोजी केले.

.        बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार यांच्या दालनात सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांची आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सेवा पंधरवडा बाबत माहिती देताना तहसीलदार रेणुका कोकाटे बोलत होत्या. यावेळी नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले, सतीश साळवे, अजय मल्लेलवार व महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

.            १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर दरम्यान बल्लारपूर तहसील प्रशासन सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात गावपातळीवर पाणंद रस्ते विषयक मोहिम, दुसऱ्या टप्प्यात सर्वासाठी घरे व तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आढावा सभेत माहिती तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी दिली.

error: Content is protected !!