ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण
पदाधिकाऱ्यांचा होता सहभाग
बल्लारपूर : बल्लारपूर शहर कांग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून फळे वाटप करून साजरा केला. हा उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी व शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वधर्म समभाव याची प्रचिती देत आहे. कांग्रेसचे पदाधिकारी सेवावृत्ती जोपासण्याचे कार्य करत आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्मदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे योजले. बल्लारपूर शहर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फळ वितरण करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, सेवादलाचे प्राणेश अमराज, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, युवक कॉंग्रेसचे सचिव चेतन गेडाम, छोट्टू सिद्धीकी,संदीप नक्षीने, डॉ. युवराज भसारकर, विनोद आत्राम, रवि वेल्हे, अनील मारशेट्टीवार,प्रफुल्ल बोप्पनवार,श्लोक तिवारी, क्षीतीज सहारे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


