विसापूर येथील शेषराव कांबळे यांची सामाजिक बांधिलकी
पालक सभा ठरली प्रेरणादायी
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार ला पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शेषराव कांबळे यांनी शाळेला मदत म्हणून ५ रूपयाची देणगी दिली. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी दिलेली देणगी अन्य पालकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या उपक्रमाबद्दल उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शेषराव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील नाकाडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोयर, अंगणवाडी सेविका चंद्रभागा पोडे, मुख्याध्यापक वनकर, शिक्षक कुळसंगे व पालकांची उपस्थिती होती.
. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून विसापूर येथील सेमी इंग्रजी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभा घेण्यात आली. या सभेला पालकांनी हजेरी लावली. सभेदरम्यान मुख्याध्यापक वनकर यांनी पाल्यांच्या प्रगतीबाबत सांगितले. पालकांनी देखील पाल्यांच्या शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.या दरम्यान शेषराव कांबळे यांनी स्वखुशीने शाळेला ५ रूपये देणगी देत असल्याचे सांगितले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे अन्य पालकांनी स्वागत केले. त्यांच्या उपक्रमाने प्रोत्साहित होऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेषराव कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी पालकांची उपस्थिती होती.


