वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमातून रोटरी क्लब ऑफ भद्रावती चे पर्यावरणीय दायित्व अभिनंदनीय
भद्रावती : निसर्गाचा समतोलपणा हा नैसर्गिक परिसंस्थेवर अवलंबून असतो या परिसंस्था अबाधित राखण्याची नैसर्गिक प्रक्रिया वृक्ष करतात मात्र अलीकडील औद्योगिक व व्यावसायिक नफेखोरी वृत्ती मुळे जंगले व परिसरातील वृक्ष अधोगती कडे जात असल्याचे जिवंत चित्र सर्वत्र दिसून येते. ओसाड व भकास होणारी वसुंधरा आजच्या अवस्थेत ग्लोबल वॉर्मिग च्या धोकादायक वळणावर येऊन ठेपली आहे.
. वृक्षाची लागवड व संवर्धन याचे महत्व ओळखुन आज दिनांक.२९ रोज शुक्रवारला रोटरी क्लब ऑफ भद्रावती तर्फे मौजा केसुर्लि बालाजी लॉन परिसरात अनेक औषधीयुक्त, व उपयुक्त वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष प्रवीण महाजन, सचिव विक्रांत बिसेन, प्रोजेक्ट सेक्रेटरी किशोर भोस्कर, कोषाध्यक्ष आनंद क्षीरसागर, रोटरीयन माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डॉ. माला प्रेमचंद, सुनील पोटदुखे, सुधीर पारधी, किशोर खंडाळकर, प्रकाश पिंपळकर, अब्बास अजानि, हनुमान घोटेकर, मनोहर नागपुरे, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, निलेश देवइकर लखन शहा तसेच निसर्गप्रेमी नागरिक आदी उपस्थित होते.
. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी सजीवांचे जीवनमान व वृक्षाचे महत्व विषद केले. रोटरी क्लब ऑफ भद्रावती तर्फे “वृक्ष लावा परिसरात.. पसरेल समृद्धी सर्वांच्या जीवनात” असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


