Home सामाजिक टेकरी येथील इंदिरा गांधी विद्यालयात तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा

टेकरी येथील इंदिरा गांधी विद्यालयात तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा

660

सिंदेवाही : क्रीडा व सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तालुका क्रीडा समिती सिंदेवाही च्या संयुक्त विद्यमाने नुकतेच इंदिरागांधी विद्यालय टेकरी येथे दोन दिवसीय तालुका स्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सिंदेवाही पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांचे हस्ते सदर स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

.       विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला, व सुप्त गुणांना अधिक चालना मिळावी, यासाठी शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना संधी देण्यात येते. दरम्यान २८ व २९ ऑगस्ट रोजी सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथील इंदिरागांधी विद्यालय येथे दोन दिवसीय तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेसाठी तालुक्यातील विविध शाळेतील असंख्य विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे उदघाट्न सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांचे हस्ते पार पाडले असून या प्रसंगी अध्यक्ष म्हणून ज्ञान संवर्धन शिक्षण संस्था मोहाळी सचिव प्रेमकुमार हरणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी विद्यालय टेकरी मुख्याध्यापक अगडे, तालुका संयोजक धनंजय मोगरे, मांढरे, निखारे, कामडी, तंटामुक्त समिती अध्यक्ष देवा मंडलवार मंचावर उपस्थित होते.

.      खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच यानिमित्ताने तालुका क्रीडा समितीच्या वतीने सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे तथा प्रेमकुमार हरणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात खेळाचे काय महत्व असते, खेळाच्या माध्यमातून नोकरी मध्ये किती म्हत्वाचे असते.? तसेच विद्यार्थ्यांचे होणारे शोषण. या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

.      यादरम्यान कबड्डी स्पर्धेत मुली १७ वर्ष वयोगटाखाली मध्ये भारत विद्यालय नवरगाव हा संघ विजेता ठरला. मुलांमध्ये वयोगट १७ वर्षाआतील इंदिरा गांधी विद्यालय टेकरी, १४ वर्ष आतील मुले इंदिरा गांधी विद्यालय टेकरी, १४ वर्ष आतील मुली भारत विद्यालय नवरगाव, १९ वर्ष आतील मुले या मध्ये सर्वोदय कनिष्ठ महा. विद्यालय, सिंदेवाही विजेता ठरला. १९ वर्ष आतील मुली मध्ये धनंजय कनिष्ठ महा. विद्यालय वासेरा हा संघ विजेता ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संयोजक धनंजय मोगरे, संचालन मांडवकर, तर मागासवर्गीय हायस्कूलचे शिक्षक कैलास मेश्राम यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!