अ. भा. श्रीगुरुदेव सेवामंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरी कडून अभिनंदन
लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी
काही व्यक्तींना जन्मजातच समाजसेवेचे बाळकडू मिळालेले असतात. ते त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग जनहितासाठीच करतात. सदैव जनसेवेत अग्रस्थानी असलेल्या घराण्यातील उमदे व तरुण नेतृत्व, नेहमी समाज सेवेची जाण ठेऊन राजकारणात वावरणारे, उत्साही व मुसद्दी नेतृत्वाची पारख असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र श्रीनिवासजी शिंदे !
रविंद्र शिंदे यांनी व नवनिर्वाचित संचालकांनी बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ सभेत सर्वानुमते एक ऐतिहासिक व चिरकाल स्मरणात राहील असा एक निर्णय घेतला. तो असा या पुढे कोणत्याही कार्यालयीन कामासाठी किंवा वयक्तिक भेटीसाठी जी व्यक्ती अध्यक्षाच्या दालनात येईल त्याचे स्वागत गुरुदेव सेवा मंडळाची भगवी टोपी व युगग्रंथ ग्रामगीता भेट देऊन सत्कार, स्वागत करण्यात येईल. हा निर्णय घेऊन आदरणीय रविंद्र शिंदे यांनी व संचालक मंडळ यांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे फार मोठे अलौकिक कार्य केले.
. मी अ. भा. श्रीगुरुदेव सेवामंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज चा सर्वाधिकारी या नात्याने त्यांचे जाहीर अभिनंदन करतो.!!. भविष्यातही आपण गुरुकुंजच्या विविध विभागास सहकार्य करावे! हीच नम्र अपेक्षा ! जयगुरुदेव !
श्री. लक्ष्मणराव गमे,
सर्वाधिकारी अ., भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ
श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम
![]()


