वरोरा : लोकशिक्षण संस्था वरोडा संचालित लोकमान्य महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सोबतच लोकमान्य महाविद्यालयाशी संलग्नित कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या केंद्राद्वारे संस्कृत दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या.
. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटक लोकशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विकास घुडे होते. त्यांनी आपल्या भाषणात कालिदासांच्या ग्रंथ लेखनावर आणि डॉ. एस. आर. रंगनाथांच्या ग्रंथालय व्यवस्थापना वरील कार्यकर्तुत्वाचे गुणगौरव केले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती लोकशिक्षण संस्थेचे सदस्य मंगेश मल्हार यांनी संस्कृत आणि ग्रंथालयातील सेवा आणि वाचक याविषयी मार्गदर्शन केले.
. जन्मदिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथ भेट या उपक्रमांतर्गत सत्र 2024- 25 मध्ये प्राप्त ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले आणि ग्रंथभेट देणाऱ्यांना आभार पत्रे देण्यात आली. संस्कृत दिनानिमित्त विद्यार्थी तसेच प्राध्यापिकांनी संस्कृत मधून सुभाषिते, बोधकथा कथन , संस्कृत गीतावर नृत्य आणि संस्कृत मधून मनाचे श्लोक सादर केले.
. या कार्यक्रमाचे संचालन अमोल निंबाळकर यांनी केले तर प्रास्ताविक ग्रंथपाल लीना पुप्पलवार यांनी केले आभार निशा कौरासेने केले. या ग्रंथप्रदर्शनाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि लोकमान्य विद्यालय, लोकमान्य इंग्लिश मीडियम, लोकमान्य कन्या शाळा तसेच हिरालाल लोया विद्यालयाचे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत प्रवेश अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी घेतला.


