Home सामाजिक विसापुरात अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान

विसापुरात अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान

675

दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्तबगार महिला म्हणून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” अंगणवाडी सेविका रेखा ढेंगळे व प्रिया ठाकूर यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुरस्कारालादाखल सन्मानपत्र, शाल,स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे चिंतामणी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

.     विसापूर ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, माजी सरपंच बंडू गिरडकर, चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद चौधरी, विसापूर पोलीस चौकीचे संतोष एनगंदेवार, वैद्यकीय अधिकारी डा. नायर, सत्कारमूर्ती रेखा ढेंगळे, प्रिया ठाकूर, जिल्हा परिषद हायस्कूलचे पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी पलक रमेश आत्राम, गौरी धनराज शेडमाके,प्रितम शंकर तेलंग, चिंतामणी माध्यमिक विद्यालयाचे यश राजेंद्र शेंडे, प्रिया किशोर गिरडकर, प्रांजली प्रकाश पावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला.

.      तत्पूर्वी येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील आशा कार्यकर्त्यांना आरोग्य तपासणी करण्यासाठी बि.पी.तपासणी यंत्र ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले. यावळी ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, दिलदार जयकर, प्रदीप गेडाम, सुरेखा इटनकर, विद्या देवाळकर, संदीप काकडे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद, गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन लिपीक संतोष निपुंगे यांनी केले.

error: Content is protected !!