वरोरा : लोकशिक्षण संस्था अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व नगर परिषद,वरोरा मार्फत “एक पेड मा के नाम” (2.0), तरुण भारत चे शताब्दी वर्ष व नरकेसरी प्रकाशन लि. अमृत महोत्सव वर्ष, हर घर तिरंगा या विविध उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता अभियान, हर घर तिरंगा रॅली चे आयोजन संयुक्तरित्या, दिनांक 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
![]()
. विद्यार्थ्यांनी स्वतः घरून आणलेली फुलझाडे व महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली झाडे, वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगणारी फलके घेऊन हर घर तिरंगा, वृक्ष लागवड व स्वच्छतेचे नारे देत स्वयंसेवकांची रॅली महाविद्यालय-सद्भावना चौक-एलआयसी ऑफिस-मैत्री पार्क-सुयोग नगरमधील श्री. बालाजी मंदिरात पोहोचली. तिथे तुळशीच्या रोपट्यासह विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व परिसर स्वच्छता करण्यात आली, तसेच स्वातंत्र्याचा उत्सव उत्साहाने साजरा करण्याची शपथ देण्यात आली. पुढे महाविद्यालयात रॅली आल्यानंतर महाविद्यालयात सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले. आपण आपल्या आईला काही देण्याचे ठरविले तरी देऊ शकत नाही. कारण तिची भूमिका खूप मोठी असते. परंतु तिच्या भूमिकेबद्दल प्रेरक काम नक्की करू शकतो.
. या अनुषंगाने एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तरुण भारत वर्तमानपत्राचे शताब्दी वर्ष व श्री. नरकेसरी प्रकाशन ली. अमृत महोत्सव वर्षानिमित्त सुचवलेला स्वच्छता उपक्रम सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहे. या उद्देशपूर्तीसाठी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन एकत्रिरित्या करण्यात आले.
. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, तरुण भारत चे वार्ताहार शाम ठेंगडी, माजी नगरसेवक छोटू शेख, नगरपरिषद वरोराचे कर्मचारी (स्वच्छता निरीक्षक) अमर बिरिया, (शहर समन्वयक तृप्ती लाडे, (फ़ायर सुपरवायझर) रवी बरसे, सुयोग नगर मधील नागरिक व श्री. बालाजी मंदिर देवस्थानचे पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी, नगर परिषदेचे सफाई कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी उपस्थित राहून खूप खूप सहकार्य केले.


