Home सामाजिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन घ्यावे

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन घ्यावे

756

डॉ.सतीश इमडे यांचा सल्ला

विसापूर येथे कृषी सखी प्रशिक्षण शिबीर

बल्लारपूर : शेतीचे उत्पादन घेताना माती परीक्षण महत्वाचे आहे. शेती आरोग्य तपासणी आजघडीला गरजेचे आहे. अधीक उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खते व किटकनाशक वापरले जाते. यामुळे जमीनीचा पोत बिघडते. हवामान बदलानुसार शेतीची आरोग्य तपासणी महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती उपयुक्त आहे. याला जोड म्हणून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन घ्यावे, असा सल्ला आनंदवन कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश इमडे यांनी बुधवार ( दि. ६ ) रोजी विसापूर येथे प्रशिक्षण शिबीरात कृषी सखी व शेतकऱ्यांना दिला.

.          बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने विसापूर येथे मुनीसमाज भवनात कृषी सखी व शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती करण्याच्या अनुषंगाने एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर बुधवार (दि. ६) ला आयोजित करण्यात आले. यावेळी कृषी सखी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडळ अधिकारी भास्कर गायकवाड होते.\

.       यावेळी मार्गदर्शक म्हणून सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश इमडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत राखुंडे, उपकृषी अधिकारी सुरेखा बोबाटे, प्रशिक्षक संदीप खिरटकर, विसापूर चे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, आत्माचे रविंद्र कन्नाके यांची उपस्थिती होती.

.      शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरून निरोगी जमीन, पोषक आहार आणि समृद्ध पृथ्वी करण्यासाठी कार्यप्रवण व्हावे.शेत जमिनीचे माती परीक्षण, पिकांसाठी पाण्याची बचत,कुटुंबाला निरोगी अन्न, वाढीव उत्पादन, बहुपिक पद्धतीने उत्पादन करण्याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक उपकृषी अधिकारी सुरेखा बोबाटे यांनी करून शिबीराची भूमिका विषद केली. संचालन रविंद्र कन्नाके यांनी केले. शिबिराच्या यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी, उद्धव डिकळे,घनश्याम टाले,निखिल पिंपळशेंडे,दत्तू आळे यांनी सहकार्य केले. यावेळी कृषी सखी व शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

error: Content is protected !!