Home सामाजिक लोकाभिमुख सेवा देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न – रेणुका कोकाटे

लोकाभिमुख सेवा देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न – रेणुका कोकाटे

711

बल्लारपुरात महसूल सप्ताहाचा प्रारंभ

महसूल प्रशासनातर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

बल्लारपूर : महसूल प्रशासन सरकार व सर्वसामान्य जनतेचा महत्वाचा दुवा आहे. सरकारच्या लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी करावी लागते. जनतेच्या विविध योजना मार्गी लावावे लागते. शहरापासून गावपातळीवर जनतेचे समाधान करावे लागते. काही वेळेस नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तरीही लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न महसूल प्रशासन करत आहे. यासाठी जनतेचे सहकार्य देखील अपेक्षित आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी महसूल सप्ताहाचा प्रारंभ करताना शुक्रवार (दि. १) आगस्ट रोजी केले.

.       बल्लारपूर उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा सन्मान, शेतकऱ्यांना सातबारा उतारा देणे, विविध योजनेतील लाभार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र वितरण, महसूल कर्मचारी व जनतेसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. बल्लारपूर तालुक्यात १ ते ७ आगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. याचा प्रारंभ करताना तहसिलदार रेणुका कोकाटे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

.       यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भूमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक अनील देशमुख, नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले,पुरवठा निरीक्षण अधिकारी प्राजक्ता सोमलवार, नायब तहसिलदार अजय मलेलवार, नायब तहसिलदार रश्मी बावरे यांची उपस्थिती होती.

.    दरम्यान महसूल अधिकारी व कर्मचार्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून तहसीलदार रेणुका कोकाटे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार सतीश साळवे, मनोरंजन फुके, मंडळ अधिकारी किशोर नवले, सहाय्यक महसूल अधिकारी सुनील तुंगीडवार,महसूल सहाय्यक राजेश निखाडे,ग्राम महसूल अधिकारी प्रकाश कम्मलवार, वाहन चालक कचरू गेडाम, शिपाई आवेश पेटकर, महसूल सेवक पुंजाराम राऊत, पोलीस पाटील किशोर मेश्राम यांचा समावेश होता.

.     बल्लारपूर तहसील कार्यालय परीसरात रोगनिदान शिबीर नागरी सेवा केंद्र बल्लारपूर तर्फे घेण्यात आले.यावेळी सर्वसामान्य जनता व महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक वढुले यांनी केले. संचालन दिपक निंबाळकर यांनी, तर उपस्थितांचे आभार राजेश निखाडे यांनी मानले. यावेळी महसूल अधिकारी, कर्मचारी, विविध योजनेतील लाभार्थी, शेतकरी व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!