🔸 आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन
🔸 नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आ. देवराव भोंगळे यांचे आवाहन !
चंद्रपुर : राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. ३० जुलै रोजी जिल्ह्यात राजुरा, घुग्घूस व पोंभुर्णा येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
. या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफतपणे करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
. सदर शिबीर राजुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात तर घुग्घूस येथे प्रयास सभागृहात आणि पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात संपन्न होणार असून सकाळी ०९ वाजेपासून सुरू होणार आहेत.
. याठिकाणी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, एन.सी.आय. कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी, नागपूर, ग्रामीण रुग्णालय राजुरा, घुग्घूस व पोंभुर्णा येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग आणि कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे.
. त्यासाठी राजुरा व पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांसह घुग्घूस शहर परिसरातील नागरिकांनी सदर शिबीरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा आमदार देवराव भोंगळे यांनी केले आहे.


