वरोरा : “तरुणाई कडून होत असलेल्या अनेक चुकीच्या सायबर घटना सांगितल्या तसेच सर्व सेवा घरपोच मिळाल्या पाहिजे अशा अपेक्षा प्रत्येकजण करीत आहे. त्यासाठी अनावश्यक ॲपचा वापर वाढत आहे आणि त्यातूनच विविध सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे, आजच्या तरुणाईने फेसबुक, व्हाट्सअप, मोबाईलचा वापर चुकीच्या कार्यासाठी न करता साक्षरतेसाठी केला तर ते एक सर्वोत्तम कार्य ठरेल. प्रमुख वक्ते मुजावार अली असे मत याप्रसंगी मांडले.
. लोकशिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजना, महिला तक्रार निवारण समिती, इंग्रजी, मराठी व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 28 जुलै ला सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून मुजावर सायबर स्वच्छता अभ्यासक, सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर चे युसूफ अली, पोलीस स्टेशन वरोरा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भस्मे, पोलीस स्टेशन वरोरा चे पोलीस उपनिरीक्षक कोमल घाडगे, सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर चे कार्तिक खनके, पोलीस स्टेशन,वरोरा च्या सुषमा पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
. सायबर गुन्ह्यातील अनेक घटना विद्यार्थ्यांना सांगितल्या.सुरुवातीला मुलामुलींचा एकमेकांवरील विश्वास पुढे विश्वासघात करतो व पुढे त्याचा त्रास सर्वांना होतो. या अनुषंगाने याप्रसंगी मत भस्मे मांडले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शास्त्री यांनी ‘प्रत्येकानी प्रत्येकवेळी आपला विवेक वापरावा व सुरक्षा करावी’ या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत पुरी यांनी, प्रास्ताविक डॉ. रवींद्र शेंडे तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी केले. या कार्यशाळेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


