Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापूर येथे तरूणीने गळफास घेतला

विसापूर येथे तरूणीने गळफास घेतला

990

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे सुरभी चौक परिसरात घरी कोणी नसताना तरूणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवार (दि. १८) रोजी दुपारी ४ वाजता घडली. गळफास घेणाऱ्या तरुणीचे नाव दुर्गा प्रकाश चिंचोलकर (१९) रा. विसापूर असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे.

.        दुर्गा चिंचोलकर हिचे वडील काही महिन्या अगोदर मृत्यू पावले होते. ती आई व भावा सोबत राहत होती. तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. भाऊ देखील घरी नव्हता. या संधीचा फायदा घेऊन तिने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती विसापूर पोलीस चौकीला देण्यात आली. पोलीस कर्मचारी अजय झोडे व राकेश मेंढे यांनी घटना स्थळी धाव घेतली. तो पर्यंत दुर्गा गतप्राण झाली होती. या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी तिचे शव शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करिष्मा मोरे, अजय झोडे व राकेश मेंढे करत आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

error: Content is protected !!