Home सामाजिक रोटरी क्लब व इनरव्हील क्लब भद्रावतीचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

रोटरी क्लब व इनरव्हील क्लब भद्रावतीचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

770

भद्रावती : रोटरी क्लब भद्रावतीच्या 2025- 26 या वर्षा करिता नवीन कार्यकारणी चा पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक 15 जुलैला सायंकाळी सात वाजता स्वागत सेलिब्रेशन हॉल अली पेट्रोल पंप जवळ भद्रावती येथे पार पडला.

.          या नव्या कार्यकारणी मध्ये प्रवीण महाजन यांना मावळते अध्यक्ष किशोर खंडाळकर यांनी कार्यभार सोपवला तसेच सचिव विक्रांतिसेन यांना मावळते सचिव आत्माराम देशमुख कोषाध्यक्ष आनंद शिरसागर यांना मावळते कोषाध्यक्ष हनुमान घोटेकर यांनी कार्यभार सोपवला तसेच प्रोजेक्ट सेक्रेटरी म्हणून किशोर भोसकर यांची निवड करण्यात आली.

.      या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारणी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची दिशा निश्चित करणार आहे. तसेच इनर व्हीलची नवीन कार्यकारणी सुद्धा गठीत करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष मनीषा ढोमणे, सचिव तृप्ती हिरादेवी, कोषाध्यक्ष रश्मी भिसेन, आयएसओ वर्षा धानोरकर, सीसी विभा बेहरे यांची निवड करन्यात आली. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर मनीष मूलचंदानी आणि भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट ग्रीटिंग चेअर भाविक तेलंग, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी अध्यक्ष डॉ माला प्रेमचंद, इनरव्हील अध्यक्ष प्रेमा पोटदुखे, सचिव सुनिता खंडाळकर यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.      या कार्यक्रमांमध्ये नवीन रोटरीयन्स प्रदीप बंग, संदीप ढेंगळे, सुयोग भोयर, मोहनिष श्रीवास्तव, मारुती महातळे, माजी सैनिक यांना तसेच इनरव्हील मध्ये निरुपमा पटेल, प्रतिभा मानकर यांना सामील करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना 11 सायकलचे वाटप करण्यात आले भद्रावतीच्या सामाजिक कार्याच्या वाटचालीत हा सोहळा महत्वपूर्ण ठरला नव्या कार्यकारणीच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपक्रम राबवले जातील असे मत नूतन अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!