Home सामाजिक शाश्वत विकासासाठी पर्याप्त लोकसंख्या आवश्यक – डॉ. श्रीनिवास पिलगूलवार

शाश्वत विकासासाठी पर्याप्त लोकसंख्या आवश्यक – डॉ. श्रीनिवास पिलगूलवार

794

वरोरा : शाश्वत विकासासाठी पर्याप्त लोकसंख्या आवश्यक, भारतातील लोकसंख्येचा विस्फोट व त्यामागील कारणे, नैसर्गिक साधन संपत्तीवर पडणारा ताण आणि त्यावरील उपाययोजना, जगाची लोकसंख्या, करोनानंतर होत असलेली जनगणना व सहकार्य अशा अनेक विषयांवर आकडेवारीसह प्रमुख वक्ते डॉ. पिलगुलवार यांनी भाष्य केले.

.       जागतिक लोकसंख्या दिन, 11 जुलै निमित्त लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथे रोटरी क्लब, वरोरा तसेच महाविद्यालयतील रासेयो या विभागाअंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील समाजशास्त्रविभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास पिलगुलवार होते. तसेच प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब,वरोरा चे अध्यक्ष योगेश डोंगरवार होते. योगेश डोंगरवार यांनी लोकसंख्या नियंत्रणात रोटरी क्लबची भूमिका याप्रसंगी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शास्त्री यांनी लोकसंख्या वाढ नियंत्रणावर समाजात जाणीव जागरूकता कशी वाढेल यावर मार्गदर्शन केले.

.       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविंद्र शेंडे यांनी केले तर डॉ. प्रशांत खुळे यांनी सुरवातीलाच रोटरी क्लबची भूमिका विविध सामाजिक उपक्रमाबाबत मांडली. तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीकांत पुरी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या व्याख्यान कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!