सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत अनेकांचा भ्रमनिरास
बल्लारपूर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर
बल्लारपूर : तालुक्यातील १७ ग्रामपंचायत साठी आज मंगळवार (दि. ८) रोजी बल्लारपूर उपविभागीय कार्यालयात तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसिलदार दीपक गुठ्ठे यांच्या उपस्थित सरपंच पदांचे सन २0२५ ते २030 वर्षासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले. या सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर येथे सलग तिसऱ्यांदा सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे आरक्षण सोडतीत दरम्यान काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
. विसापूर ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी अनुसूचित जाती महिला राखीव म्हणून रिता नितीन जिलटे, अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर विद्देमान सरपंच वर्षा मच्छिंद्र कुळमेथे तर आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला राखीव करण्यात आले आहे. यामुळे विसापूर ग्रामपंचायत मध्ये सलग तिसऱ्यांदा महिलांना सरपंच पदाची लाटरी लागली आहे.
. आजच्या सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत अनेकांचा भ्रमनिरास दिसून आला. यापूर्वी काढण्यात सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत बरेच फेरबदल झाले आहे. 23 एप्रिल 2025 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली होती. त्यानुसार गावपातळीवर अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यांचा आजच्या आरक्षण सोडतीत चांगलाच भ्रमनिरास झाला. अनुसूचित जाती महिलांसाठी गिलबिली व ईटोली,तर अनुसूचित जाती सर्वसाधारण सरपंच पद दहेली ग्रामपंचायत ला मिळाले आहे. अनुसूचित जमाती महिलांना मानोरा व लावारी, तर अनुसूचित जमाती सर्वसाधारण म्हणून आयडी व हडस्ती ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद राखीव करण्यात आले.
. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांना (ओबीसी) विसापूर व कळमना, तर याच वर्गात सर्वसाधारण सरपंच पद नांदगाव (पोडे), पळसगाव व बामणी (दुधोली) ग्रामपंचायत मध्ये आहे. सर्वसाधारण महिलांना किन्ही, कवडजई व काटवली (बामणी), तर सर्वसाधारण सरपंच पद कोर्टिमक्ता व कोठारी ग्रामपंचायत मध्ये आरक्षण सोडतीत मिळाले आहे.
. यावेळी अनेकांनी आरक्षण सोडतीत आक्षेप घेतला. मात्र तहसिलदार रेणुका कोकाटे व नायब तहसिलदार दीपक गुठ्ठे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.


