Home सामाजिक जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिंदेवाही तहसील कार्यालयात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिंदेवाही तहसील कार्यालयात वृक्षारोपण

800

सिंदेवाही : पर्यावरण ही मानवाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. पर्यावरणाचे महत्व काय आहे. याकडे मानवाने लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यावरणानें मानवाला दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आणि त्याची शपथ घेण्यासाठी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्या दिनाचे औचित्य साधून सिंदेवाही तहसील कार्यालय मार्फत कार्यालयाच्या आवारात नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

.        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे जयंती दिनी सकाळी त्यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर तहसीलदार संदीप पानमंद यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यालयाच्या आवारात विविध फुलझाडे, फळझाडे, लावून कृषी दिन साजरा करण्यात आला. आपण पर्यावरणाचे आहोत. हे प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. कारण पर्यावरणमुळेच जीवन शक्य आहे. सर्व मानवप्राणी, नैसर्गिक वनस्पती, झाडे, हवामान हे सर्व पर्यावरणात सामावलेले आहे. पर्यावरण केवळ हवामानाचा समतोल राखण्याचे काम करत नाही. तर जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरविते.

.        आधुनिकीकरण, औद्योगीकरण, आणि वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. मानव आपल्या स्वार्थापोटी वृक्षतोड करून नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी तहसीलदार संदीप पानमंद, नायब तहसीलदार मंगेश तुमराम, वहाने, देशमुख, दिनेश पुजारी तथा मनरेगाचे देवानंद बनसोड इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!