Home सामाजिक मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन

794

चंद्रपूर : सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना, त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचा-यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

.       त्यानुषंगाने एप्रिल ते जुन 2025 अखेर संपणाऱ्या तिमाहिची माहिती नमुना ई.आर.-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर या कार्यालयाव्दारे ऑनलाईन पध्दतीने दि. 1 जुलै, 2025 पासून सुरू झाले आहे. याकरीता सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यास्तव चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर आयडी व पासवर्ड देण्यांत आले आहेत. ज्या आस्थापनांना प्राप्त झालेले नाही त्यांनी प्राप्त करून घ्यावा. त्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करून www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

.      माहे एप्रिल ते जून 2025अखेर संपणाऱ्या तिमाही विवरणपत्र सादर करावयाची अंतिम तारीख 31 जुलै, 2025 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com यावर तसेच दुरध्वनी क्र. 07172-252295 वर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!