Home सामाजिक मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना खासदार प्रतिभा धानोरकरांनी भरविला घास

मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना खासदार प्रतिभा धानोरकरांनी भरविला घास

808

बल्लारपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमाला आज शुक्रवार ला भेट दिली. त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत संवाद साधला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांना मायेचा घास आपुलकीने भरविला.

.     चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर हद्दीतील मातोश्री वृद्धाश्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांनी त्यांचे आदरातिथ्य केले. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.खासदार प्रतिभा धानोरकरांनी वृद्धांशी संवाद साधला. यावेळी वृद्धाश्रमातील ६0 आसपास वृद्धांना त्यांनी स्वतःच्या हाताने आपुलकीने मायेचा घास भरविला.

.    यावेळी कांग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, बल्लारपूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, महिला जिल्हा कांग्रेसच्या अध्यक्ष सुनंदा धोबे,चंद्रपूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष रामु तिवारी, कांग्रेसच्या जेष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे, वासुदेव येरगुडे, प्राणेश अमराज, चंदा वैरागडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!