Home सामाजिक काशिनाथ इटनकर यांचे गावाच्या विकासात योगदान – रामभाऊ टोंगे

काशिनाथ इटनकर यांचे गावाच्या विकासात योगदान – रामभाऊ टोंगे

801

विसापूर येथे शेतकरी, शेतमजूरांचा सत्कार

शतकोत्तर जयंती समारंभ

बल्लारपूर : स्व.काशिनाथ इटनकर यांनी गावाचे सरपंच म्हणून विकासात योगदान दिले आहे. त्यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे. यामुळे त्यांची शतकोत्तर जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांच्यातील स्पष्टपणा व कणखर नेतृत्व आजही स्मरणात आहे. सामान्यपणाच्या नात्यांची त्यांनी नाळ जोडली होती, असे प्रतिपादन माजी सरपंच तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ टोंगे यांनी विसापूर येथे केले.

.    बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जनविकास कृती समितीच्या वतीने स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात स्व.काशिनाथ इटनकर यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष हरणे होते.

.       प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच रामभाऊ टोंगे, बंडू गिरडकर, भारद्वाज जीवने, संध्या पेंदोर, शकुंतला इटनकर, परशुराम साखरकर, सुरेश पंदीलवार, सुनीता पोहाणे, आयोजक नरेंद्र इटनकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी स्व.काशिनाथ इटनकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले.

.      दरम्यान सत्कारमूर्ती आशा काळे, कलावती भोयर, अर्चना डाहुले, अर्चना पोतराजे, उद्धव पाटणकर, सुरेश पंदीलवार, नितीन बुटले, रामभाऊ धोटे, सुखदेव नगराळे, सुभाष हरणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयोजक नरेंद्र इटनकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश निपुंगे यांनी केले, तर आभार अर्चना पोतराजे यांनी मानले. यावेळी गावातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!