Home सामाजिक नंदोरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुतळ्याचे भव्य अनावरण

नंदोरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुतळ्याचे भव्य अनावरण

864

चंद्रपूर : धर्म, शौर्य, न्याय आणि जनकल्याण यांचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नंदोरी गावात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा भव्य उत्साहात पार पडला.

.           आमदार करण देवतळे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली.

.          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी उत्पादक कंपनीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य वामन तुर्के, पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रवीण ठेंगणे, धनराज विरुटकर, सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, तसेच ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, संगीता एकरे, शरद खामनकर, माजी उपसरपंच भानुदास ढवस, घनश्याम ढवस, रवी खाडे, स्वप्नील लांबट, नीलकंठ अवगान, देवराव आस्कर, तुळशीराम लांबट यांची उपस्थिती लाभली.

.        कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी उपस्थित राहून अहिल्यादेवींना अभिवादन केले. त्यांच्या समाजकल्याणकारी कार्याचा गौरव करत गावात एकतेचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

.            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा सुखदेव आस्कर व सुभाष बुरांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश मोंढे, राहुल अवगान, धर्मेंद्र आस्कर, सतीश अवगान, रवी काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!