वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात

5

चालक जखमी

खांबाडा येथील घटना

नेरी : गोंदेडा येथून वरात घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने खांबाडा गावाजवळील विवेकानंद विद्यालयाच्या समोर झाडाला धडक बसल्याने अपघात झाला. ही घटना रविवारी दि. 18 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. यात ट्रॅव्हल्स चालक राजू वरघणे (65) हा गंभीर जखमी असून वरातीतील काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

.       सविस्तर असे की गोंदेडा येथील सुरेश श्रावण डांगे यांच्या मुलीचे लग्न वर्धा येथे दि 18 मे ला सायंकाळी होते. त्या लग्नाला जाण्यासाठी आणि वरात नेण्यासाठी उमरेड येथील साईराम टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स ची एम एच-04 एफ के -4686 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स केली होती. सदर ट्रॅव्हल्स गोंदेडा येथून वरात घेऊन निघाली असता खांबाडा जवळील विवेकानंद विद्यालयाच्या समोर चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक दिली. या धडकेत चालक राजू माधव वरघणे हा गंभीर जखमी झाला तर काही वरातीतील लोकांना किरकोळ मार लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही वेळातच घटना स्थळा वरून ट्रॅव्हल्स हटविण्यात आली असून या अपघाताची माहिती पोलीस विभागाला सुद्धा देण्यात आली नसल्याची माहिती आहे.