Home सामाजिक वरोऱ्यात स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

वरोऱ्यात स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

1162

वरोरा : येथील तुलना रोड, फिल्टर टाकी येथे श्री स्वामी समर्थ धाम मंदिरात दिनांक 26 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

.      सकाळी 6 वाजता गुरुवर्य राजूरकर महाराज यांच्या उपस्थितीत हर्षल आसुटकर, मिलिंद आसुटकर, बंडू आसुटकर, प्रशांत भोयर, पंढरीनाथ खिरटकर, संजय चौधरी, प्रशांत डोगरवार, आकाश बागल, भारत तोरकडी, श्रेयस बोधाने अन्य भक्तासह महाराजांचा अभिषेक करण्यात आला. दुपारी बारा वाजता असंख्य स्वामीभक्त यांच्या उपस्थितीत भव्य महाआरतीची आयोजन करण्यात आलेले होते. दुपारी 12.30 वाजता नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन स्वामी समर्थ धाम येथे सभागृहात करण्यात आले होते.

.        यावेळी मंदिराची हार फुलांनी सजवले होते, मंदिरा सभोवताल रंगीबेरंगी लायटिंग करण्यात आली होती. यावेळी असंख्य भाविक भक्ताने या कार्यक्रमाचा लाभ घेतला, या भक्तिमय वातावरणात सर्व परिसरात भक्तिमय झाल्याचे दिसून आले होते. या कार्यक्रमासाठी विलास दरापुरकर, लंके, भास्कर दुधलकर, सुहास आत्राम, सचिन लक्कावार, मनोज गहुकर, मनिष भुसारी, सौरभ जगताप, विनोद सोरते यांच्यासह अनेक स्वामी भक्तानी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!