पोकरा अंतर्गत लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन आराखड्यास सुरुवात

8

नागभीड : तालुक्यातील नवानगर येथे कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा २.0 च्या सूक्ष्म नियोजन आराखड्यास मशाल फेरी घेऊन सुरुवात करण्यास आली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हा परिषद शाळा बोंड व नवानगर शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, महिला शेतकरी, शेतकरी यांच्यासमवेत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

.        यावेळी कृषी विभागामार्फत बदलत्या हवामानास अनुकूल शेती पद्धतीस चालना मिळावी, याकरिता जागतिक बँक अर्थसाहित योजनेचा लाभ सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचे शासनाचे धोरण असल्याचे प्रतिपादन पी एस शिंदे मंडळ कृषी अधिकारी तळोदी बा. यांनी केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेतीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान,मृदा व जलसंधारण, जैविक शेती, पौष्टिक अन्नधान्य उत्पादन, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना यासारख्या बाबीवर मार्गदर्शन एस ए पाकमोडे यांनी केले. प्रत्येक गावासाठी भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार स्वतंत्र हवामान अनुकूलन आराखडा तयार करण्यात येत आहे. या सूक्ष्म नियोजन आराखड्याची सुरुवात नवानगर येथे विविध उपक्रम घेऊन करण्यात आली. यात *मशाल फेरी, प्रभात फेरी, गाव नकाशा रेखाटन, शिवार फेरीचे आयोजन*आदी. करण्यात आले. हवामान बदलामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी या प्रकल्पात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सी एस दाडगे कृषी सहाय्यक, देवपायली यांनी केले.

.     या कार्यक्रमास गावच्या सरपंच निशा सीडाम तसेच गावातील इतर पदाधिकारी, ग्राम कृषी विकास समितीचे सर्व सदस्य, कृषी, सर्व स्वयसेवक उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एन के घुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर सोनुले यांनी केले. हा कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक जी पी टेंभुर्णे, कृषी सहाय्यक रघुते, गेडाम, बाकडे, रामटेके, मदनकर, माने, पटेल यांनी उपस्थित राहून विविध उपक्रमांचे नियोजन केले. या कार्यक्रमास गावातील विद्यार्थी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.