Home सामाजिक सिंदेवाही तालुक्यातील २७ ग्राम पंचायत वर येणार महिलाराज

सिंदेवाही तालुक्यातील २७ ग्राम पंचायत वर येणार महिलाराज

954

५० ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण झाले जाहीर

सिंदेवाही : ग्राम पंचायत ही गावाच्या विकासाचा केंद्र बिंदू आहे. आणि सरपंच हा ग्राम पंचायत चा कार्यकारी प्रमुख असतो. सरपंचांनी मनात आणले तर आपल्या गावाचे नंदनवन करू शकतो. अशा या सरपंच पदाचे बुधवारी सिंदेवाही तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले असून तालुक्यातील ५० ग्राम पंचायत पैकी तब्बल २७ ग्राम पंचायत वर महिलाराज येणार असल्याने अनेकांचे सरपंच बनण्याचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

.     फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असून यावेळी सरपंच पदाची निवड ही थेट जनतेमधून करण्यात येत असल्याने अनेकांना चांगलाच कस लागणार आहे. सिंदेवाही तालुक्यातील अनेक दिग्गज कार्यकर्ते सरपंच पदाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना नुकत्याच जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणाने त्यांचेवर पाणी फिरले असल्याची चर्चा गावागावात सुरू झाली आहे. तालुक्यात एकूण ५० ग्राम पंचायती कार्यरत असून ४ ग्राम पंचायत चा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्याठिकाणी प्रशासक ची नेमणूक झाली आहे. तर उर्वरित ग्राम पंचायत चा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे सिंदेवाही तहसील कार्यालयातील सभागृहात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये मुरमाडी, टेकरी, सिरकाडा या ग्राम पंचायत अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आले आहेत. तर डोंगरगाव, पेटगाव, मरेगाव तू. या ग्राम पंचायतवर अनु.जाती महिला साठी राखीव करण्यात आले आहे. सरडपार  या ठिकाणी नामाप्र. साठी राखीव करण्यात आले.

.      मोहाडी नले., कळमगाव तुकूम याठिकाणी नामाप्र महिला साठी राखीव करण्यात आले आहे. पवनाचक, सिंगडझरी, शिवणी, कारवा, मेंढामाल, कच्चेपार, आलेसुर, रत्नापूर, घोट, सामदा खुर्द, कन्हाळगाव, उमरवही, या ग्राम पंचायत सर्वसाधारण साठी राखीव करण्यात आल्या, तर नांदगाव, कुकडहेटी , गडमौशी, खातगाव, भेंडाळा, नवरगाव, लोणखैरी, नवेगाव लोन, विरव्हा, तांबेगडी मेंढा, चिकमारा , गुंजेवाही रामाळा या ग्राम पंचायत वर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. पेंढरी कोके, पवनपार, गडबोरी, देलनवाडी , कळमगांव गन्ना, मिनघरी, अंतरगाव, वानेरी , या ग्राम पंचायती अनुसूचित जमाती साठी राखीव करण्यात आल्या. तर वासेरा, नाचनभट्टी, वाकल, किन्ही, पळसगाव जाट, लाडबोरी, चारगाव बडगे, जामसाळा या ग्राम पंचायती अनु.जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. ५० पैकी एकूण २७ ग्राम पंचायत वर महिला राज येणार असल्याने अनेकांचे सरपंच बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांचे प्रमुख उपस्थित सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

error: Content is protected !!