Home सामाजिक वन अकादमीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

वन अकादमीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

968

चंद्रपूर : गुणवत्ता, शाश्वत पर्यावरणीय व्यवस्थापन आणि वनसंवर्धनाच्या दिशेने घेतलेल्या पुढाकारांची दखल घेत चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन अकादमीला (वन अकादमी) प्रतिष्ठित ‘आयएसओ 9001:2015’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र अकादमीला पर्यावरण व्यवस्थापन, वन व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, वनाग्नी प्रतिबंध, इको-टुरिझम व मानव-प्राणी संघर्ष निवारण या क्षेत्रात दाखविलेल्या उत्कृष्टतेबद्दल मिळाले आहे. अकादमीची कार्यप्रणाली, प्रशिक्षण पद्धती व व्यवस्थापन प्रणाली जागतिक दर्जाच्या निकषांनुसार आहेत, हे यावरून सिध्द झाल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.

.        सोबतच भारत सरकारच्या Capacity Building Commission कडून अकादमीला “Very Good” (ट्रिपल स्टार) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आले आहे.

वन अकादमीबद्दल माहिती : 1961 मध्ये ‘वनपाल प्रशिक्षण विद्यालय’ म्हणून सुरू झालेली ही संस्था आज 44.5 हेक्टर परिसरात विस्तारली असून त्यात 16 प्रशिक्षण कक्ष, 4 प्रेक्षागृहे, अधिकारी निवासस्थाने, महिला व पुरुष प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, क्रीडा संकुल, व्यायामशाळा आणि आधुनिक डिजिटल वर्ग यांचा समावेश आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रात्यक्षिक अनुभव, क्षेत्रभेटी व तांत्रिक कौशल्य विकासावर आधारित असून, पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज अशा भावी वन अधिकाऱ्यांची घडण या माध्यमातून केली जाते.

.      शासनाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात या अकादमीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून ती शाश्वत वनीकरण, जैवविविधता संवर्धन व पर्यावरणीय नेतृत्व क्षेत्रात ठोस भूमिका बजावत आहे.

error: Content is protected !!