Home सामाजिक शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढविण्यासाठी नवीन अनुज्ञाप्ती

शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढविण्यासाठी नवीन अनुज्ञाप्ती

1245

वरोरा : राष्ट्रीय कृषि बाजार कार्यप्रणालीनूसार शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढविण्यासाठी मुख्य बाजार आवार वरोरा व उपबाजार आवार शेगाव, माढेळी, खांबाडा येथे शेतमाल खरेदी करण्यासाठी नविन व्यापारी अनुज्ञाप्ती देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

.     कृषि उत्पन्न बाजार समिती वरोराची राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) मध्ये निवड झालेली असून, राजीव गांधी मार्केट वरोरा येथे ऑनलाईन शेतमाल खरेदी-विक्री करण्यासाठी आवश्यक संगणक संच, असेईंग लॅब, इंटरनेट सेवा सुविधा करण्यात आलेली आहे. ई-नाम कार्यप्रणालीनूसार शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार करणे पारदर्शक असून शेतकरी, व्यापारी, अडते व बाजार समिती अशा सर्वांसाठी सोईस्कर व हिताचे आहे. त्यामूळे राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) कार्यप्रणालीनूसार शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढविण्यासाठी नविन परवाना (अनुज्ञाप्ती) देणे सुरू आहे. तसेच मुख्य बाजार आवार वरोरा व उपबाजार आवार शेगाव, माढेळी, खांबाडा येथे शेतमाल खरेदी करण्यासाठी नविन व्यापारी परवाना (अनुज्ञाप्ती) देण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे. सोबतच नविन लायसन्स घेणाऱ्या व्यक्तीस शेतमाल खरेदीचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे नविन परवाना घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी बाजार समितीचे मुख्य कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती, डॉ. विजय रामचंद्र देवतळे, उपसभापती जयंत मोरेश्वरराव टेमूर्डे व सचिव चंद्रसेन साहेबराव शिंदे यांनी केले आहे.

error: Content is protected !!